सांडपाण्याच्या टाकीतून गव्यारेड्याची सुटका

Edited by: विनायक गांवस
Published on: May 14, 2026 14:13 PM
views 24  views

सावंतवाडी : माजगाव ख्रिश्चन वाडी‌ येथे सांडपाण्याच्या टाकीमध्ये गवा रेडा पडल्याचे दिसून आले असता त्यानी वनविभागाशी संपर्क साधला. यानंतर सावंतवाडी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी जात त्या गव्याची सुटका केली‌

सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी कर्मचारी व रेसक्यू टीम यांच्या समवेत गवारेडयाला जीवदान देत त्याला नैसर्गिक अधिवासात हुसकावले. या बचाव मोहीमेत वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक अक्षय कुंभार, पवन तर्फे, मोहन घुटुकडे, वनमजूर आनंद कुराडे, पुंडलिक गावडे, तुषार सावंत, शुभम कळसुलकर आदी उपस्थित होते.