गौड ब्राह्मण समाजाने एकत्र आलं पाहिजे : मंत्री उदय सामंत

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 08, 2025 16:50 PM
views 33  views

कुडाळ : आपला गौड ब्राह्मण समाज विखुरलेला समाज हा एकत्र आला पाहिजे. आपल्या समाजाचा उद्धार झाला पाहिजे हा उद्धार होत असताना इतर समाजाला सुद्धा आपण पुढे नेले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केपीएल 2025 क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी आज केले .

१० व्या कुडाळदेशकर प्रीमियर लीग (केपीएल) २०२५ या  क्रीडामहोत्सवाला आजपासून कुडाळ हायस्कूल मैदानावर सुरुवात झाली उद्या ९ नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव असणार आहे. देशभरातून सुमारे ८५० खेळाडूंनी नाव नोंदणी झाली आहे आज या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष रणजीत देसाई, ज्येष्ठ उद्योजक जगदीश वालावलकर, अँड संग्राम देसाई रमेश झारापकर ,क्रीडा संघटक मनीष दाभोलकर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, विवेक सामंत 

ज्येष्ठ चित्रकार अरुण दाभोलकर, गोपाल कृष्ण प्रभू ,सुरेश सामंत विनय सामंत, अंजली सामंत,  माधवी प्रभू ,रोहिणी कोचरेकर, उमेश नायक, राजेंद्र नायक ,प्रदीप देसाई, अनिलकुमार नायक, मनीष ठाकूर , मुरलीधर प्रभू, जयंत नायक  शिवानंद प्रभू ,केदार सामंत, प्रशांत धोंड, प्रफुल्ल वालावलकर, अभय वालावलकर अतुल सामंत, प्रदीप नेरुरकर, राजन नाईक ,रोहन देसाई, मनोज वालावलकर, अभय सामंत, सचिन देसाई, तृप्ती प्रभू देसाई, विपुल प्रभू, श्रीकृष्ण सामंत, साहिल देसाई,  सागर नाईक, मनोज तेंडुलकर, अमित तेंडुलकर स्वानंद सामंत महोत्सवासाठी महाराष्ट्र गोवा कर्नाटकसह मोठ्या संख्येने ज्ञातीबांधव  उपस्थित होते. 

यावेळी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले , आपल्या गौड ब्राह्मण समाजाची वाटचाल लक्षात घेता आपला समाज विखुरलेला आहे. आपल्या समाजाचे पालघर या ठिकाणी भवन झाले तशाच प्रकारचे भवन या ठिकाणी होण्यासाठी माझा निश्चितच प्रयत्न राहणार आहे पूर्वजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे .राजकारण बाजूला ठेवून आपण जातीसाठी एकत्र आले पाहिजे. आपल्या समाजाची वाटचाल करतानाच इतर समाजाला सुद्धा आपण  पुढे घेऊन  गेले पाहिजे तरच आपण प्रगती कडे वाटचाल करू शकतो .बांबू लागवडसाठी केंद्र सरकार सबसिडी देते,आपल्या समाजाने शेती क्षेत्रातसुद्धा पुढे आले पाहिजे असे सांगितले.या केपीएलच्या माध्यमातून आपण आपल्या समाजाला पुढे घेऊन जाताना गेली दहा वर्षे के पी एल महोत्सव होतो. आपल्या समाजातून अनेक पुस्तके लिहिली जातात तशाचप्रकारे के पी एल वर पुस्तक लिहिणे महत्त्वाचे आहे त्यामुळे जिल्हा, राज्यात शैक्षणिक, क्रीडामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळते असे सांगितले 

यावेळी बोलताना देशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अध्यक्ष रणजीत देसाई म्हणाले, समाज ऐक्याची नवीन व अभिनव दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी 'गौड ब्राह्मण सभा ही समाजसेवी ज्ञातीसंस्था १८९७ साली गिरगावात १२८ वर्षा पूर्वी स्थापन झाली. पूर्वजांचे विचार व संस्कार नव्या पिढीपर्यंत डोळसपणे पोहोचवणे त्यांना एकत्र आणणे, बंधुता, एकता व विश्वास निर्माण करणे, वधू-वर सभा-संमेलने, इत्यादी मेळावे भरवून अंगीभूत कलागुणांना वाव देणे. कलाकारांचा, विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा उचित आदर सन्मान करणे, गरीब, गरजू, होतकरू, मुला-मुलींना शिष्यवृत्ती देणे, पारितोषिके देऊन गौरविणे निराधार, निराश्रित महिला-पुरुष, कर्करोग, हृदयविकार, मतिमंद आदि व्याधिग्रस्त यांना वैद्यकीय सहाय्य, कन्यादान निधी वाटप आदीसाठी गौड ब्राह्मण कार्यरत आहे असे सांगितले. यावेळी कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य का. आ .सामंत यांचा सत्कार करण्यात आला. 

प्रास्ताविकात मनीष दाभोलकर यांनी दहा वर्षाच्या केपील २०२५ चा धावता आढावा घेतला सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.