
दोडामार्ग : वझरे दोडामार्ग मार्गे संपूर्ण जिल्ह्याभरात गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या गॅस टाकीला संरक्षक जाळी नसल्याने या वाहनांपासून अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते या उद्देशाने आज कसई दोडामार्ग नगरपंचायत चे नगराध्यक्ष चेतन चव्हाण व भाजप पदाधिकाऱ्यांनी वाहने अडवून पोलीसांच्या ताब्यात दिली.
याबात अधिक माहिती आशिकी तालुक्यातील वझरे येथून दोडामार्ग मार्गे संपूर्ण जिल्ह्याभरात ट्रक गाडीवर ओपन गॅस टाक्या बसवून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात गॅस वाहतुक सुरु आहे. या वाहतुकी मुळे दोडामार्ग बाजारपेठेत अनेक अपघात झाले. आणि 4 दिवसांपूर्वी डेगवे येथे या ट्रक वरील ओपन गॅस टाक्या कोसळून खाली पडल्या व अपघात घडला गॅस टाक्या एमटी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी घडली नाही. मात्र या टाक्यामध्ये गॅस भरलेला असता तर मोठा अपघात घडला असता. याच पार्श्वभूमीवर आज बांदा मार्गे दोडामार्ग च्या दिशेने येणाऱ्या या गाड्या दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी गॅस वाहतूक रोखत दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी समीर रेडकर, राजेश फुलारी, पराशर सावंत, दीपक गवस आदी उपस्थित आहे.
यावेळी दोडामार्ग पोलिसांनी या वाहतुकी संदर्भात जिल्हा आरटीओ विभाग यांना पत्र व्यवहार करून तपासणी करण्यात यावी आहि मागणी केली. त्या नंतर सदरील वाहन चालकांना नोटीस बजावून वाहने सोडण्यात आली.