गॅसचा टँकर पलटी ; चालक जखमी

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 05, 2023 12:25 PM
views 211  views

कणकवली : कणकवली वागदे हळवल फाट्यावरील अवघड वळणावर गुरुवारी 11.30 वाजण्याच्या सुमारास गॅसचा टँकर पलटी झाला. यात चालकाला काही प्रमाणात दुखापत झाली आहे.

सातत्याने या वळणावर अपघात होत असून, हे अपघात रोखण्यासाठी  महामार्ग प्राधिकरणकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हे अपघात केव्हा बंद होणार?  यासाठी उपाययोजना होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.