
सावंतवाडी : मळगाव ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मळगाव येथील गॅस पाईपलाईनचं चालू असलेलं खोदकाम बंद केलं. त्यावेळी उपस्थित मनसे नेते सुधीर राऊळ, राष्ट्रवादी सिद्धेश तेंडुलकर, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ, सोनल सावळ, सागर कांदळगावकर, राकेश परब, प्रभाकर खडपकर, दिलीप खडपकर, शंकर सावंत, गजानन सातार्डेकर, शतायु जांभळे, आदित्य राऊळ, आबा चिपकर, अतुल केसरकर, सुखदेव राऊळ, साहील तळकटकर, सखाराम राऊळ यांनी जोरदार विरोध केला. पहील्यांदा हायवे सर्विस रोडची झालेली दुर्दशा दुरुस्त करून द्या, रोड चांगल्या पद्धतीने लोकांना डांबरीकरण करून द्या, मगच पुढील काम चालू करा, नाय तर पुढील कामास सर्वाचाच विरोध राहील, असं सुनावण्यात आलं.