राहत्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट | मोठा अनर्थ टळला

Edited by:
Published on: April 17, 2024 06:26 AM
views 834  views

दोडामार्ग :  झोळंबे राऊळवाडी येथील अलका अनंत राऊळ यांच्या राहत्या घरात काल सोमवारी सायंकाळच्या समरस एलपिजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने त्यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील अनेक वस्तूंचे नुकसान झाले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, झोळंबे येथील राऊळवाडी मध्ये अलका अनंत राऊळ या आपल्या मुलासमवेत राहतात. काल सायंकाळ च्या सुमारास त्यांच्या घरातील एलपीजी गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यावेळी नाईक व त्यांचा मुलगा भयभीत झाले व ते घराबाहेर पळाले.

या स्फोटामध्ये घराच्या भिंतींना भेगा पडल्या शिवाय दारे खिडकी यांचीही मोठी नुकसानी झाली. तसेच घरातील अन्न धान्य शिवाय इतर सामुग्री देखील स्फोटाच्या आगीत जाळून खाक झाली. आसपासच्या ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करत स्फोटामुळे लागलेल्या आगीवर कसेबसे नियंत्रण मिळविले. तलाठी वंदना पाटील यांनी सदर घटनेचा पंचनामा केला.