मंत्री राणेंच्या खासदार निधीतून बांदा ग्रामपंचायतला कचरा संकलन गाडी

Edited by: विनायक गावस
Published on: February 14, 2024 11:21 AM
views 124  views

सावंतवाडी : केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या खासदार निधीतून बांदा ग्रामपंचायतसाठी कचरा संकलन गाडी देण्यात आलेली आहे. या गाडीचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक १५ रोजी दुपारी १ वाजता संपन्न होणार आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे, कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार राजन तेली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, प्रदेश सदस्य मंदार कल्याणकर, सावंतवाडी विधानसभा सरचिटणीस महेश सारंग, माजी सभापती प्रमोद कामत, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, महिला बांदा मंडल अध्यक्ष रुपाली शिरसाट, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम सावंत, सर्व ग्रामपंचायत सदस्य व भाजप पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा लोकार्पण कार्यक्रम दुपारी १ वाजता श्री बांदेश्वर मंदिर जवळ होणार आहे. तरी बांदा शहरातील भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बांदा शहर भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.