सावंतवाडीत रविवारी गरबा नाईट !

रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: October 21, 2023 14:25 PM
views 328  views

सावंतवाडी :  रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने खुल्या गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ७ वा. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान समोर हा कार्यक्रम होणारं आहे. या सोहळ्यात सर्व सावंतवाडीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष रो. भावेश भिसे यांनी केले आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. नॉन स्टॉप म्युझीकचा आस्वाद सावंतवाडीकरांना घेता येणार आहे.