शॉर्ट सर्किटमुळे गॅरेजला आग

10 लाखांचे नुकसान
Edited by: श्रीधर साळूंखे
Published on: February 06, 2025 18:52 PM
views 452  views

वैभववाडी : शॉर्ट सर्किट होऊन कोकीसरे बेळेकरवाडी येथील आसीफ बाबासाहेब आरवाडे यांच्या गॅरेजला आग लागली. गॅरेजमधील सर्व साहित्य जळून सुमारे १० लाख २०हजार रुपयांच नुकसान झाले. ही दुर्घटना बुधवारी मध्यरात्री घडला.

श्री.आरीफ यांचं तळेरे-वैभववाडी मार्गावर दुचाकीच गॅरेज आहे. बुधवारी रात्री ९वा  गॅरेजमधील काम संपवून ते घरी परतले. आज सकाळी ६.४४ या त्यांना फोन आला, तुमच्या दुकानातून धुर येतोय अशी माहिती दिली. त्यानंतर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता गॅरेजमध्ये सर्व साहित्य जळून खाक झाले होते. यामध्ये दुचाकीच्या बॅट-या, ऑईल, विविध पार्ट, ग्रास कटर, लाकूड कटर आदी मशीन जळून सुमारे १०लाख २०हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी जाऊन पोलीस हवा. सोनल गोसावी, हरिष जायभाय यांनी  पंचनामा केला.