गणपती चालले गावाला..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 28, 2023 19:06 PM
views 135  views

कुडाळ : गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात कुडाळ तालुक्यासह जिल्हाभरात गुरुवारी सायंकाळी  दहा दिवसांच्या गणरायांचं अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत बाप्पांचा जयघोष करत श्री गणेश मूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. तर उद्या शुक्रवारी अकराव्या दिवशी श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

गेली दहा दिवस घरोघरी पूजन करण्यात आलेल्या श्री गणेश मूर्तींचे गुरुवारी सायंकाळी नदी तलाव ओहोळ आधी ठिकाणी भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. विसर्जन ठिकाणी प्रारंभी आरती करण्यात आली त्यानंतर श्रींना निरोप देण्यात आला. शहरासह ग्रामीण भागात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.