गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने १८ नोव्हेंबरला दिपोत्सव !

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 16, 2023 17:48 PM
views 72  views

कणकवली : श्री देव गांगेश्वर मित्रमंडळातर्फे दीपावलीनिमित्त शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी `दिपोत्सव २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पाककला स्पर्धा (तांदळापासून केलेले पारंपारिक पदार्थ) व जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  १८ रोजी सायं. ५ वाजता पाककला स्पर्धा गांगोमंदिरकडे आयोजित केली आहे.

या स्पर्धा खुल्या गटासाठी असून या गांगोवाडी मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यानंतर ८ वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशी आहे. लहान गट ५ ते १२ वर्ष व मोठा गट १२ वर्षावरील असा असेल. या स्पर्धांचे बक्षीस वितरण १८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता गांगोमंदिर (गांगोवाडी) कणकवली येथे होणार आहे. स्पर्धेचे नियम स्पर्धेच्या ठिकाणी सांगितले जातील. 

जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांकासाठी ३००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांक २००० रुपये व चषक, तृतीय १००० रुपये व चषक, उत्तेजनार्थ प्रथम ५०० रुपये व चषक, उत्तेजनार्थ द्वितीय ५०० रुपये व चषक तसेच लहान गटासाठी प्रथम क्रमांक २००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांक १५०० रुपये व चषक, तृतीय १००० रुपये व चषक, उत्तेजनार्थ प्रथम ५०० रुपये व चषक, उत्तेजनार्थ द्वितीय ५०० रुपये व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पाककला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांक ७५० रुपये व चषक, तृतीय ५०० रुपये व चषक, उत्तेजनार्थ ३०० रुपये व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी चानी जाधव (८२०८४५२२६६), शितल मांजरेकर (८६००२९२९०४) व मृणाल परुळेकर (९४०४९२२८२८) तसेच पाककला स्पर्धेसाठी शितल मांजरेकर (८६००२९२९०४) व योगेश जाधव (८७९३३०९९६६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.