
सावंतवाडी : भैरववाडी तरुण मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त माध्यमातून आयोजित गणेश सजावट स्पर्धा अतिशय उत्तमरित्या संपन्न झाली. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्या स्पर्धकांची नावे आज घोषित करण्यात आली आहेत.
या स्पर्धेत विठ्ठल मंदिर आणि वारकरी देखावा सादर केलेल्या रवींद्र साईल प्रथम (रक्कम ५,५५५/- रुपये), नैसर्गिक सजावटीच्या देखाव्यासाठी भिवा सावंत यांचे द्वितीय (रक्कम ३,३३३ /- रुपये), तर भगवान शंकर देखाव्यासाठी केशव साईल तृतीय विजेता (रक्कम २,२२२/- रुपये) म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तर पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या देखाव्यासाठी अंकुश साईल यांची आणि अष्टविनायक देखाव्यासाठी रूपा सावंत यांची निवड उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी (अनुक्रमे रक्कम १,१११ /-, १००१/-) , निवड करण्यात आली.
या स्पर्धेला परीक्षक म्हणून कुडाळ तालुक्यातील पाट गावचे सुपुत्र, BKC चे प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा.अमर प्रभू आणि माडखोल गावचे सुपुत्र, शांतीनिकेतनचे प्राध्यापक श्रीकृष्ण कुडतरकर लाभले. तर स्पर्धेस संजय लक्ष्मण सावंत, सत्यवान लक्ष्मण सावंत, आनंद जगन्नाथ परब, दीपक देवेंद्र साईल, भगवान वसंत साईल, पुंडलिक सीताराम सावंत, अंकुश रामा साईल, अक्षय हरिश्चंद्र साईल, संजय मनोहर सावंत, योगेश आत्माराम साईल, सदानंद चंद्रकांत साईल, तुषार महादेव सावंत आणि केतन सखाराम साईल यांचे आर्थिक सहाय्य्य लाभले. भैरववाडीतील तमाम नागरिकांचे त्याच बरोबर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले आहेत.