
सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी श्री. केसरकर यांनी राज्यातील तमाम जनतेला गणपतीच्या शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले, महाराष्ट्राची सेवा करण्याचे भाग्य गणरायाच्या कृपाशीर्वादाने मला लाभले. शालेय शिक्षणमंत्री म्हणून मंत्रीपदाचा उपयोग कोकणसाठी केला. मंत्री म्हणून कार्यरत असताना चांदा ते बांदा, सिंधुरत्न सारख्या योजना राबवू शकलो. त्यामुळे गणारायकडे एकच मागणं आहे की येणाऱ्या काळात कोकणची अधिक सेवा करता यावी, याहीपेक्षा माझ्या हातून चांगली सेवा घडावी यासाठी त्याने शक्ती, आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गणराया चरणी केली. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर व केसरकर कुटुंबिय उपस्थित होते.