
सावंतवाडी : कोकणातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा येथील गणरायाला चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. यंदा या मंडळाचे ११९ वे वर्ष आहे. या निमित्ताने गणराया चरणी अँड. संकेत अभय नेवगी व संदेश अशोक नेवगी यांच्याकडून हा चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे.
पुढील २१ दिवस या ठिकाणी मोठा उत्साह असणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी श्रींचे दर्शन घेत जनतेला सुखी, समाधानी ठेव, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो असं साकडं घातलं.