
देवगड : नागपंचमी झाली की वेध लागतात ते श्री गणेश चतुर्थीचे गणपती येण्यासाठी आता काहीच दिवस बाकी राहिलेले असताना गणपती चित्र शाळा गजबजू लागल्या आहेत.गणपती चित्र शाळेत गणपती बनवण्यासाठी लगबग सुरू असलेली दिसून येत आहे.देवगड येथे गणेशमूर्ती बनवण्याची लगबग सुरु झालीअसून श्री गणेशासाठी चित्रशाळा जागू लागल्या आहेत.मूर्तिकार कामात मग्न असल्याचे दिसत आहेत.
बहुतेक येथील सर्व गणेश मूर्ती या स्थानिक मूर्तिकारांकडून बनवल्या जातात.दरवर्षी चिकणमातीत,रंग तसेच मजुरीत वाढ होत असल्यामुळे मूर्तींचे दरही मूर्तिकारांना वाढवावे लागत आहेत.चिकणमातीचा अभाव असल्याने कर्नाटकातील अंकोला, माजाळी या भागातून चिकणमाती आणावी लागत आहे.