गणेश वायंगणकर स्ट्रॉंग मॅन ऑफ सिंधुदुर्ग, अश्विनी सावंत स्ट्रॉंग वुमन

वेंगुर्ला शहर शिवसेना - नाईक जिम अँड फिटनेस सेंटर यांचे आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: October 19, 2023 20:11 PM
views 147  views

वेंगुर्ले : वेंगुर्ल्यात नव्याने सुरुवात झालेल्या सुसज्ज अशा नाईक जिम अँड फिटनेस सेंटर वेंगुर्ला, कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व वेंगुर्ला शहर शिवसेना यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा २०२३ मध्ये गणेश वायंगणकर यांनी स्ट्रॉंग मॅन ऑफ सिंधुदुर्ग तर अश्विनी सावंत यांनी स्ट्रॉंग वुमन ऑफ सिंधुदुर्गचा किताब पटकावला. तर तौसिफ शेख याने सबज्युनिअर स्ट्रॉंग बॉय, ऋषिकेश तेली याने ज्युनिअर स्ट्रॉंग बॉय, सायली सावंत हिने सब ज्युनिअर स्ट्रॉंग वूमन व ज्युनिअर स्ट्रॉंग वुमन, टीना चौगुले हिने मास्टर स्ट्रॉंग वूमन किताब पटकावले. 

 या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे उदघाटन शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, नाईक जिम अँड फिटनेस वेंगुर्ला चे संचालक अमित  नाईक यांच्या सहित इतर मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे - 

     सिनिअर पुरुष प्रकारात ५९ किलो वजनी गट मनिष कुणकेकर विजेता, ६६ किलो वजनी गट प्रथम प्रणित घुमडे, द्वितीय अमर मगर व तृतीय तरूण सौनी, ७४ किलो वजनी गट प्रथम आयुष नाईक, द्वितीय चेतन जगताप, तृतीय राहूल मयेकर, ८३ किलो वजनी गट प्रथम गणेश वायंगणकर, द्वितीय देऊ केरकर, ९३ किलो वजनी गट प्रथम ओंकार कुबडे, द्वितीय मनोज परब, तृतीय स्वप्निल पालकर, १०५ किलो वजनी गट प्रथम अक्षय कुबल, द्वितीय योगेश रावल. 

    ज्युनिअर पुरुष प्रकारात ५३ किलो वजनी गट पंकज मल्हार, शुभम हळदिवे, शुभम गावडे, साहिल देऊलकर, गौरेश गावडे, प्रथमेश शारबिद्रे, भगवान बागायतकर, सुशांत चोडणकर, ५९ किलो वजनी गट आदित्य पालव, वासुदेव गडदे, साहिल बागायतकर, रहित झोरे, गोपाळ सावंत, ६६ किलो वजनी गट बाळकृष्ण परब, विशाल लाड, मिलेश सावंत, अमेया गावडे, ओम पवार, ७४ किलो वजनी गट बाबली करमळकर, दीप जाधव, वैभव खवटणकर, पवन रेवडेकर, तन्मय चव्हाण, वैभव खटवणकर, ८३ किलो वजनी गट ऋषिकेश तेली, गौरांग गायकवाड, अक्षय ठक्कर, लोकेश गावडे, अंकुश सिग, साहिल यादव, प्रज्वल पालव, ९३ किलो वजनी गट समर्थ भावे, १०५ किलो वजनी गट ओंकार भारती यांनी यश संपादन केले.

       सब ज्युनिअर मुले ५३ किलो वजनी गट श्रेयस धुवाळी, यश सावंत, लौकीक पाटील, मिनीओ फर्नांडीस, ५९ किलो वजनी गट आराध्य चौगुले, प्रणव करीवडेकर, मयुरेश परब, ६६ किलो वजनी गट पृथ्वीराज राठोड, सौराज परब, यश सावंत, ७४ किलो वजनी गट प्रणव सागवेकर, गतीक परब, तिर्थेश करंगुटकर, ८३ किलो वजनी गट तौसिफ शेख, यश चव्हाण, ९३ किलो वजनी गट - तनिष्क कुबल, १०५ किलो वजनी गट - हर्ष सावंत यांनी यश संपादन केले. मास्टर पुरुष ५९ किलो वजनी गट गोविद कळवटे,  ७४ किलो वजनी गट शशांक साटम, ८३ किलो वजनी गट मंगेश भोगले, प्रदिप नारकर, मास्टर २  सुरेश कदम, स्ट्राँग मॅन मास्टर - गोविद कळबटे यांनी यश संपादन केले. 

    तसेच सब जुनिअर मुली प्रकारात ५२ किलो वजनीगट सायली सावंत, ५७ किलो वजनीगट वेदा साटम, ६३ किलो वजनी गट, गुंजन बहादूर, ७६ किलो वजनीगट यशश्री परब, ८४ किलो वजनीगट हेमांगी मेस्त्री, जुनिअर मुली प्रकारात ५७ किलो वजनी गट प्रसन्ना परब, अस्विता तेली, तेजल बागडे, ६३ किलो वजनीगट नेहा लाड, ६९ किलो वजनीगट अस्विनी सावंत, पूनम विश्वकर्मा, ७६ किलो वजनीगट उत्कर्षां नवार, सिनिअर मुली प्रकारात ५२ किलो वजनीगट सायली सावंत, ५७ किलो वजनीगट अस्विता तेली, प्रसन्ना परब, वेदा साटम, ६३ किलो वजनीगट गुंजन बहादूर, नेहा लाड, टीना चौगुले, ६९ किलो वजनीगट अश्विनी सावंत, पूनम विश्वकर्मा, ७६ किलो वजनीगट यशश्री परब, ८४ किलो वजनीगट स्मिता पोटे, मास्टर १ महिला प्रकारात ५२ किलो वजनीगट मनीषा असरीत, ५७ किलो वजनी गट प्रज्ञा पेडणेकर, ६३ किलो वजनी गट टीना चौगुले, ७६ किलो वजनी गट आशा हजारे, ८४ किलो वजनी गट स्मिता पोटे, मास्टर २ महिला प्रकारात ५२ किलो वजनी गट चेतना चव्हाण, ६३ किलो वजनी गट नेहा घाडी यांनी यश संपादन केले.

   या स्पर्धेसाठी पंच म्हणून संजय साटम, गणेश वायंगणकर यांनी काम पाहिले. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन परुळकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नाईक जिम अँड फिटनेस सेंटर वेंगुर्लाच्या सभासदांनी मेहनत घेतली.