
कणकवली खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत
कणकवली : कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे आता वारे वाहू लागले आहे. मधी काही दिवसांसाठी ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती त्यानंतर 18 डिसेंबर रोजी पुन्हा स्थगिती आदेश उठल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजप पुरस्कृत गणेश तांबे यांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे गटातील सुभाष जाधव फोंडाघाट यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने गणेश तांबे यांची अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे
आता 14 जागांसाठी 7 जानेवारीला निवडणूक होणार आहे या 14 जागांसाठी तब्बल 27 उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक पॅनल यांच्यात आता थेट लढत होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर कणकवलीत शेतकरी संघाच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनि आपले लक्ष केंद्रीत केले आहे