
कणकवली : गणेश सावंत हे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणारी व्यक्ती या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदावर निवड झाल्याने लोकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. १५ आॅगस्टची तह्कुफ ग्रामसभा दिनांक १२ सप्टेंबरला झाली. या सभेत मावळते तंटामुक्ती अध्यक्ष पद्माकार पांगम यांनी चांगले काम केल्याबद्दल अभिनंद करण्यात आले आणि नवीन तंटामुक्ती अध्यक्ष गणेश सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.










