
वेंगुर्ला : गणेश चतुर्थी निमित्त दरवर्षीप्रमाणे कोचरा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तसेच कोचरे-मायने ग्रामस्थांना कोचरे सरपंच योगेश तेली यांच्यावतीने गणेश पूजन साहित्य व शिधावाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेना म्हापण विभाग प्रमुख तथा एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर यांच्या हस्ते या वाटपाचा शुभारंभ आज २५ ऑगस्ट रोजी कोचरे ग्रामपंचायतच्या सभागृहात करण्यात आला.
यावेळी सरपंच योगेश तेली, उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुतार, संजय गोसावी, विशाल वेंगुर्लेकर, प्रगती राऊळ, उर्मिला कडपकर, सुनिता परब, स्वरा हळदणकर, पूजा नांदोस्कर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.