महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ गणेश पाटेकर यांचा रोटरी क्लब कडून सन्मान..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 12, 2023 14:08 PM
views 419  views

वैभववाडी : येथील महावितरण कंपनीत प्रधान तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या गणेश अनंत पाटेकर यांचा रोटरी क्लब वैभववाडीच्यावतीने सन्मान करण्यात आला.या कंपनीत गेली कित्येक वर्षे प्रामाणिकपणे काम करून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

श्री. पाटेकर हे तालुक्यात वीज वितरण कंपनीत प्रथम वायरमन म्हणून सेवा बजावत होते.त्यानंतर त्यांना प्रधान तंत्रज्ञ म्हणून बढती मिळाली.गेली कित्येक वर्षे ते या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करीत आहेत.त्या कामाची दखल घेऊन, रोटरी क्लबच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी रोटरी क्लबचे  गव्हर्नर चिफ असिस्टंट  अशोक नाईक, प्रणय तेली, असिसस्टंट गव्हरर्णर  राजन बोभाटे, उपनगराध्यक्ष संजय सावंत,रोटरीयन संजय पुनाळेकर,. डॉ. विध्याधर तायशेटे, दिपक बेलवलकर, निता गोवेकर,  प्रविण पोकळे, अॅड. अंधारी,  व वैभववाडी तालुका अध्यक्ष संजय रावराणे, सचिव प्रशांत गुळेकर, माजी अध्यक्ष संतोष टक्के,तेजस आंबेकर यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.