
दोडामार्ग : गणेश चतुर्थीच्या बाजारासाठी दोडामार्गात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तालुक्यातील तसेच लगतच्या गोवा राज्यातील ही नागरिक चतुर्थीच्या बाजारासाठी दोडामार्ग बाजारात आले आहे. माटोळीसाठी लागणारे सामान मोठ्या प्रमाणात आले आहे. तसेच कापड दुकान इलेक्ट्रॉनिक दुकान सजल्या आहेत.
अवघ्या दोन दिवसात गणेश चतुर्थीच सण आला आहे. आणि आपल्या बाप्पाला लागणारे सामान किंवा माटोळी साठी लागणारे सामान घेण्यासाठी दोडामार्ग बाजारात नागरिकांनी आज गुरुवारी एकच गर्दी केली आहे. नारळ,केळी सुपारी, व इतर जंगली सामान इत्यादी सामान तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात बाजारत घेऊन आले आहे. लोकांची गर्दी व गाड्यांची वर्दळ आटोक्यात आणण्यासाठी दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी कडक बंदोबस्त केला आहे. ठीक ठिकाणी पोलीस व होमगार्ड लावले आहे.
तसेच नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी आपल्या नगरपंच्यायतच्या कर्मचाऱ्यांना घेऊन बाजारात सरस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्याना लाईन मातून नियमात बसण्याची व्यवस्था केली आहे. व्यवस्थितरीत्या सर्व नागरिक आपला बाजार घेऊन जातं आहे. मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने बाजारावर काहीसा परिणाम होताना दिसत आहे.