
कणकवली : गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर कणकवली शहर आणि जानवली या दोन गावांना जोडणाऱ्या जानवली नदीपात्रातील गणपतीसाना येथील मोठ्या पुलाची उभारणी काम बांधकाम विभागाने अवघ्या दोन महिने वीस दिवसात पूर्ण केले आहे. जून महिन्यात येथून वाहतूक देखील सुरू होईल. दोन महिन्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या पुलाच्या भूमिपूजन झाले होते आणि आता हे पूल जून महिन्यात वाहतुकीस खुले होणार आहे त्यामुळे कणकवली असल्यांकडून समाधान व्यक्त होत आहे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध कामे मार्गी लागली त्या मधलं एक काम म्हणजे कणकवली गणपती साना ब्रिज या ब्रिज साठी आमदार नितेश राणे यांनी विशेष पाठपुरावा केला आहे .त्यामुळे सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च २०२४ मध्ये या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. जून महिन्यात पाऊस मोठा असतो त्यामुळे जलद गतीने ठेकेदाराने देखील हे काम पूर्ण करण्याचा निश्चय केला.
८ कोटी ८ लाख रूपयांचा निधी मंजूर असलेल्या या पुलाचे काम अवघ्या दोन महिने वीस दिवसात पूर्ण केले. यासाठी ठेकेदाराने देखील विशेष मेहनत घेतली याच जून महिन्यात हे ब्रिज वाहतुकीस देखील खुले होणार असल्याचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्व गोड यांनी सांगितले तसेच त्यांच्यासोबत जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी या ब्रिजमुळे कणकवलीतील बाजारपेठेतला पुनर्जीवीतपणा येणार आहे त्यामुळे समस्त कणकवली वासियांना या ब्रिजचा उपयोग होणार आहे. त्यामुळे शेवटच्या टप्यात राहिलेले काम काही दिवसात पूर्ण होऊन वाहतुकीस हा पूल खुला होणार असल्याने नागरीकांतूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.