
दोडामार्ग : गणेशचतुर्थी निमित्त साळ खोलपेवाडी येथे भोसले कुटुंबीय यांच्या निवासस्थानी गणराया समोर शैलेश दशरथ भोसले आयोजित गायक विश्वजित मेस्त्री व त्यांच्या टीमच्या खास भजनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. चौथ्या दिवशी सायंकाळी झालेल्या या विश्वजीत मेस्त्री यांच्या गायनाला विद्याधर नाईक यांची हार्मोनियम तर तबला वादक संकेत खलप यांची सुरेख संगीत साथ लाभली. मंजिर वादन प्रज्योत राऊत यांनी केले. भोसले कुटुंबीय श्रींच्या चरणी दरवर्षी विविधांगी भजन, कीर्तन, गायन, फुगडी, गुमट आरती असे असे संस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. गावातील साऱ्या गणेश भक्तांसाठी ही एक पर्वणी असते. गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार, गणेशभक्त यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित असतो.










