शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोल्हापूर विभागीय सचिवपदी गजानन नानचे बिनविरोध

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 30, 2023 19:24 PM
views 144  views

कुडाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे महामंडळावर कोल्हापूर विभागीय सचिव पदी शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग चे वरिष्ठ लिपिक श्री गजानन नानचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाची सन 2023 ते 2026 कालावधीत निवडणूक प्रक्रिया दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी साने गुरुजी स्मारक पटवर्धन हायस्कूल पुणे येथील पार पडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षक कर्मचारी संघटनेचे सचिव श्री गजानन नानचे कोल्हापूर विभागीय सचिव पदी निवड झाल्याने वेताळ बाबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ पणदूर  तालुका कुडाळ या संस्थेतील चेअरमन श्री रघुनाथ गावडे, सचिव श्री नागेंद्र परब,संचालक श्री शिवराम अणावकर, संचालक श्री एम एस पाटील तसेच मुख्याध्यापक श्री एस व्ही मालवणकर, पर्यवेक्षक श्री मिलिंद कर्पे, श्री. गावकर शाळेतील सर्व शिक्षकेत्तर बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी चेअरमन श्री रघुनाथ गावडे यांनी प्रशालेचे वरिष्ठ लिपिक गजानन नानचे राज्य संघटनेच्या कोल्हापूर विभागीय सचिव पदी निवड झाल्याने या संस्थेचे नाव कोल्हापूर विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये जाईल असे समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीस नानचे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.