
मालवण : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही उद्या 20 फेब्रुवारी रोजी सातेरीमांड देऊळवाडा येथील भोजणे परिवार यांच्या निवासस्थानी श्री गजानन महाराज प्रकटदीन सोहळा होणार आहे. यानिमित्त सकाळी 9 वाजता अभिषेक, दुपारी आरत त्यानंतर महाप्रसाद आणि सायंकाळी सुश्राव्य भजने होणार आहेत.
5 वाजता श्रीकृष्ण वैश्य समाज महिला मंडळाचे भजन, रात्री 8 वाजता राठिवडे येथील वारकरी भजन होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भोजणे परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.