
चिपळूण : शहरातील गांधी चौकातील विजय हॉटेलचे मालक गजानन ऊर्फ गजाभाऊ बापट यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांच्या राहात्या घरी निधन झाले. नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी, बाजार मारुती मंडळ मंडळाचे ट्रस्टी , अशा अनेक संस्थांची यशस्वीपणे जबाबदारी त्यांनी पार पाडली . त्यांनी वडिलांबरोबर हॉटेल व्यवसायाला सुरुवात करून या धंद्यात मोठे नाव कमावले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, नातवंडे, तसेच भाऊ हॉटेल वैभवचे संचालक श्री. विजयशेठ बापट, वृदांवन लॉजचे संचालक श्री. रामशेठ बापट असा त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंतयात्रेला चिपळूण परिसरातील सर्व स्तरातील लोक हजर होते.