
मालवण : गाबीत समाजाचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार आहे अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली आहे. आज मंत्रालयात याबाबत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे उपस्थित होते. यावेळी मंत्री सावे यांनी लवकरच महामंडळ स्थापन होणार असे आश्वासन दिले.
गाबीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गाबीत समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी गाबीत समाजाच्या वतीने करण्यात आली होती. निलेश राणे आमदार झाल्यानंतर अनेक प्रश्न मंत्रालय स्तरावर लावून धरले आहेत. नुकतीच दशावतारी कलाकारांना राजाश्रय यासाठी यासाठी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन विषय तडीस नेला. आज मंत्रालयात गाबीत समाजाचे आर्थिक विकास महामंडळ स्थापनेबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली.