
देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वर धार्मिक प्रादेशिक पर्यटन स्थळ अंतर्गत विकासकामांना निधी उपलब्ध करुन द्यावा यासाठी महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री सिंधुदूर्ग जिल्हा पालक मंत्री ना.नितेश राणे यांना निवेदन देण्यात आले आहे.
मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसादिनी हे निवेदन त्यांना सुपूर्द करण्यात आले आहे.या निवेदनात श्री क्षेत्र कुणकेश्वर हे प्राचीन इतिहासकालीन शिवमंदिर आहे.आणि कोकणची काशी म्हणून संबोधले जाते तसेच धार्मिक पर्यटन क्षेत्रामध्ये प्रामुख्याने श्री तिर्थक्षेत्र कुणकेश्वरचा उल्लेख आहे. या ठिकाणी वर्षभरामध्ये लाखो भाविक भक्त - पर्यटक यात्रेकरु येत असतात. 'कोड नेस्ट ट्रॅव्हलर' तर्फ प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये जागतिक ३० सुंदर पर्यटन स्थळांमध्ये भारतातील उल्लेखिलेल्या ०९ स्थळांमध्ये श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराचा उल्लेख आहे व हि बाब आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे.
श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान हे शासनमान्य 'ब' वर्ग प्राप्त धार्मिक पर्यटन स्थळ आहे. सन २०१८-१९ मध्ये सुमारे १ कोटी ५८ लाख मात्र एवढा निधी प्राप्त होऊन काही अंशी विकासकामे पुर्णत्वास गेलेली आहेत. परंतु भाविक यात्रेकरु पर्यटक यांच्या सुखसोयीच्या दृष्टीने उर्वरीत विकासकामे होणे गरजेचे असुन त्यासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे. त्यामध्ये कुणकेश्वर मंदिरालगत भाविक R.C.C वर्शनमंडप बांधकाम करणे. भक्तांसाठी सुसज्ज ३.२६,०१,२१६.०० भक्तनिवास इमारतीमध्ये अतिमहनीय (V.I.P.) व्यक्तींसाठी निवास व्यवस्था तयार करणी मक्तनिवास इमारत विस्तारीत करणे६४,९७,९३०.०० आंतरराष्ट्रीय (इंटरनॅशनल) दर्जाचे सुलभ शौचालयाचे बांधकाम करणे व सांडपाणी (ट्रेनेज) व्यवस्था करणे. ५०,२३,७१०.०० मंदिराचे सभोवारील संरक्षक भिंतीचे व मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करणे. ६०,५५,३६८.०० कुणकेश्वर मंदिरालगत धार्मिक विधींकरीता शेडचे बांधकाम करणे.४२,५७,६३१.०० श्री कुणकेश्वर मंदिर लगत नवीन भक्त निवास उभारणे व सुखसुविधा निर्माण करणे २५,००,००,०००.०० महापुरुष पार ते कुणकेश्वर मंदिर पर्यंत पादचारी पुल (उड्डाणपुल) बांधणे.२,००,००,०००.00 मौजे कुणकेश्वर मधील देवस्थान मालकीचे जागेत श्री महादेवाची मुर्ती उभारुन बैठक व्यवस्था सुशोभिकरण करणे. गार्डन व ६,००,००,०००.00 कुणकेश्वर देवस्थान दर्शन मंडप ठिकाणी भाविक भक्तांचे दर्शन व्यवस्थेसाठी फोल्डींग स्टील बॅरिकेटींग तयार करणे. २५,००,०००.00 एकुण ३८,६९,३५,८५५.०० या सर्व विकास कामांना निधी उपलब्ध करुन मिळावा अशा आशयाचे निवेदन मंत्री नितेश राणे यांच्याजवळ सुपूर्द करण्यात आले आहे.यावेळी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली सरपंच महेश ताम्हणकर, बबन चव्हाण,प्रल्हाद गावडे, राकेश वाळके, प्रमोद आंबेरकर, उदय पेडणेक,आदी उपस्थित होते.