निरवडेच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही : राजन तेली

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 29, 2023 15:53 PM
views 111  views

सावंतवाडी : निरवडे गावच्या विकासासाठी कोठेही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही माजी आमदार राजन तेली यांनी दिली. निरवडे, कोनापाल, बांदिवडेकरवाडी ते नेमळे रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी निरवडे गावचे माजी सरपंच तथा सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन प्रमोद गावडे, निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, पंचायत समिती माजी सभापती प्रियांका गावडे, ग्रामपंचायत सदस्य आदेश जाधव, शिवसेना उपतालुकाप्रमुख संदिप पांढरे, संतोष गावडे, मोहन बांदिवडेकर, संदिप पायनाईक,दादा बांदिवडेकर,काका बांदिवडेकर,सुहास गावडे,दिनकर गावडे,शरद बांदिवडेकर,मोहन सावंत,विजय धारगळकर,दिनेश जाधव,गजानन बांदिवडेकर,मंगेश बांदिवडेकर,संदिप नाईक,विजय सावंत,बाळा सावंत,सुरज पायनाईक,सचिन मुळीक यांसह  ग्रामस्थ उपस्थित होते.