
कुडाळ : माणगाव खोऱ्यातील सर्वात दुर्गम आणि शेवटच्या गावांपैकी एक असलेल्या आंजिवडे गावासाठी आनंदाची बातमी आहे. येथील ग्रामदैवत श्री सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आमदार निलेश राणे यांच्या शिफारशी तून आलेल्या या निधीमुळे आंजिवडे येथील ग्रामदेवता मंदिराच्या परिसराचे सौंदर्य वाढवण्यास आणि भाविकांसाठी अधिक सुविधा निर्माण करण्यास मदत होणार आहे.
आंजिवडे गावच्या ग्रामदेवता मंदिर सुशोभीकरण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल, गावातील नागरिकांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नारकर, विनायक राणे, आणि दिलीप सावंत यांचे आभार व्यक्त केले आहेत. कृष्णा पंधारे यांनी आंजिवडे गावाच्या वतीने हे आभार मानले आहेत.
या निधीमुळे मंदिराच्या सुशोभीकरणाला लवकरच सुरुवात होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.










