वायंगणीतील विकासकामांचा धडाका !

दीपक केसरकरांच्या माध्यमातून निधी
Edited by: दिपेश परब
Published on: December 21, 2023 16:21 PM
views 237  views

वेंगुर्ला : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व वेंगुर्ला शिवसेनेच्या प्रयत्नातून वायंगणी येथे मंजूर झालेल्या सुमारे ३० लाख ३१ हजारांच्या विविध रस्त्यांची भूमिपूजन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर व खानोली उपसरपंच सचिन परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.

राज्य शासनाच्या मार्च २०२३ अर्थसंकल्पीय निधी अंतर्गत मंजूर झालेल्या वायंगणी, दाभोली, तेंडोली मुख्य रस्ता ते धनगरवाडी- सातार्डेकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे या सुमारे ४ लाख २६ हजार रुपये किमतीच्या रस्त्याचे वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर दाभोली तेंडोली मुख्य रस्ता ते धनगरवाडी- सातार्डेकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे या सुमारे ५ लाख ९० हजार रुपये किमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन खानोली उपसरपंच सचिन परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका संघटक बाळा दळवी, युवासेनेचे मितेश परब, आडेली ग्रा प सदस्य सुधीर धुरी , मातोंड ग्रा प सदस्य दिपेश परब, ठेकेदार प्रथमेश सावंत, सचिन नार्वेकर, महेंद्र सातार्डेकर, हर्षल सातार्डेकर, रामचंद्र सातार्डेकर, परशुराम सातार्डेकर, मुद्रा कांबळी, बाळा कांबळी, वासुदेव सातार्डेकर, भाऊ सातार्डेकर, आबा सातार्डेकर, वनिता सातार्डेकर, ताता सातार्डेकर, विठ्ठल सातार्डेकर, मनिषा सातार्डेकर, गजानन सातार्डेकर, श्री केळूसकर, प्रताप मांजरेकर, नाना करंगूटकर, ओंकार खानोलकर आदी उपस्थित होते.



शिवसेनेच्यावतीने नितीन मांजरेकर यांच्या हस्ते सरपंच अवी दुतोंडकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वायंगणी ते पोयडेवाडी रस्ता ग्रामीण मार्ग १८६ किमी मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे या सुमारे २० लाख १५ हजार रुपयांच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सरपंच अवी दुतोंडकर, विभाग प्रमुख नरेश बोवलेकर, माजी पं स सदस्य समाधान बांदवलकर, आडेली ग्रा प सदस्य सुधीर धुरी, चंद्रशेखर बलराम तोरस्कर, चंद्रशेखर रामकृष्ण तोरस्कर, निवृत्ती तोरस्कर, कीर्तिश तोरस्कर आदी उपस्थित होते.