
सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभागानं गेल्या दहा वर्षांत आंबोली घाटात ४० कोटी पेक्षा अधिक निधी खर्च केला आहे. याचा हिशोब मागण्यासाठी आम्ही आज कार्यकारी अभियंतांची भेट घेतली. भ्रष्टाचारात जे अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची आमची प्रमुख मागणी आहे. या विरूद्ध प्रखर अस आंदोलन आम्ही उभारणार आहोत. आंबोलीत देशसेवा करणारे सैनिक राहतात. आंबोलीसाठी आलेला निधी काही अधिकारी कुरतडत आहेत. त्या उंदराना ठेचण्यासाठी सैनिकांनी आम्हाला साथ द्यावी असं आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल.
सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांची माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी आंबोली घाटात अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांनी सादर केले. तर आजवर खर्च झालेल्या निधीचा हिशोब त्यांनी मागितला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दोडामार्ग व सावंतावडीत काम करणाऱ्या दोन ठेकेदारांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी देखील यावेळी बबन साळगावकर यांनी केली. यावेळी अभियंता महेंद्र किणी यांनी याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल अस आश्वासन दिल़.
४० कोटींचा हिशोब द्या !
आंबोलीत आजवर असंख्य अपघात झालेले आहेत. गेल्यावर्षीच केलेला रस्ता खराब झालेला आहे. या संदर्भात मागणी केल्यानंतर रस्त्याची डागडुजी केली जात आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांत आंबोली घाटात ४० कोटी पेक्षा खर्च केला गेला आहे. याचा हिशोब मागण्यासाठी आम्ही आलोत. या घाटात झालेल्या भ्रष्टाचारात जे सार्वजनिक बांधकामचे अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची आमची प्रमुख मागणी आहे. हे रस्ते खराब का होतात हा मुख्य प्रश्न आहे. कार्यकारी अभियंताना आम्ही पुरावे सादर केलेत. त्यांनी यावर कारवाईच आश्वासन दिल आहे. तर विशिष्ठांच लक्ष वेधणार असल्याच त्यांनी सांगितले आहे. त्यांनी निर्णय नाही घेतला तर आम्ही कोर्टात जाणार आहोत. प्रखर अस आंदोलन सार्वजनिक बांधकाम विरूद्ध करणार आहोत.
आंबोली, चौकुळ भागात देशसेवा करणारे सैनिक राहतात. आंबोलीसाठी आलेला निधी काही अधिकारी कुरतडत आहेत. त्या उंदराना ठेचण्यासाठी आम्ही आंदोलन उभ करत आहोत. सैनिकांनी यात सहभागी होत आंबोलीच पर्यटन वाचवावे अस आवाहन त्यांनी केलं. याप्रसंगी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमेश कोरगावकर, सिताराम गावडे, मिहीर मठकर आदी उपस्थित होते.