संदीप गावडे यांची वचनपूर्ती

Edited by: विनायक गांवस
Published on: September 25, 2024 14:05 PM
views 148  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील 11 जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत रूप-टॉप ऑफ ग्रीड सौर ऊर्जा निर्मिती संच साहित्य वितरित करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा काही दिवसांपूर्वी भाजपा नेते संदीप गावडे यांनी पत्रकार परिषद घेत केली होती. त्याची वचनपूर्ती आता होत आहे. हे संच वितरित करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

२६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता. वैश्य भवन, गवळी तिठा,सावंतवाडी येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.  सावंतवाडी तालुक्यातील ११ शाळांचा वर्गखोल्या रूफ टॉप ऑफ ग्रीड खाली आणल्या जातील अशी घोषणा संदीप गावडे यांनी केली होती. लगेचच त्याची वचनपूर्तीही होत आहे. यामुळे यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. उद्या होणाऱ्या या कार्यक्रमामुळे गावडे जे बोलतात ते करतात हे यातून सिद्ध झाले आहे.