पोस्कोतील फरारी आरोपी प्रमोद परब गोव्यात जेरबंद !

सिंधुदुर्ग क्राईम ब्रांचला यश
Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 30, 2023 19:18 PM
views 840  views

सिंधुदुर्गनगरी : पोस्को कायद्याअंतर्गत फरार आरोपी प्रमोद मधुकर परब याला मडगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. प्रमोद परब याला सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्यावतीने 24 मे 2022 ला पोस्को अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्याला कोर्टासमोर हजर करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यावेळी त्याला कोलगाव येथे क्वाॅॅरंटीन करण्यात आले होते. मात्र तेथून तो फरार झाला होता. त्याला अखेर आज मडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, हा आरोपी फरार झाल्यापासून सिंधुदुर्ग पोलीस त्याच्या शोधात होते. महाराष्ट्रासह इअतर राज्यातील पोलीस ठाण्यात संशयित आरोपीची माहिती सिंधुदुर्ग क्राईम ब्रांचने दिली होती. दरम्यान,  पंढरपूर, शिर्डी, कारवार, भटकळ, अजमापूरसह गोव्यात LCB ने नजर ठेवली होती. अखेर मडगाव पोलिसांनी या आरोपीला जेरबंद केले. मडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गोरक्षनाथ गवस यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. तर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपअधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचचे संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेहेंद्र  घाग, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर यांनी संशयित आरोपीला अजुक रीत्या सापळ्यात अडकविण्यासाठी मेहनत घेतली.