झोळंबेत २६ नोव्हेंबरला खुल्या फुगडी स्पर्धा !

Edited by: विनायक गावस
Published on: November 15, 2023 15:31 PM
views 120  views

सावंतवाडी: झोळंबे येथील भजन प्रेमी महिला व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता झोळंबे प्राथमिक शाळेच्या रंगमंच्यावर खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१ रूपये द्वितीय पारितोषिक ३००१ रुपये, तृतीय पारितोषिक २००१ रुपये, उत्तेजनार्थ प्रथम ११११ रूपये, व्दितीय १००१ रूपये आणि प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट गायन निवेदक, वादक, नृत्य जोडी कोरस यांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.या स्पर्धेत प्रथम ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या बारा संघांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक फुगडी संघानी जगदीश गवस 9421265151 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.