NCPकडून वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप

अबिद नाईक यांच्या वाढदिवसाचं निमित्त
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 18, 2023 17:54 PM
views 138  views

वैभववाडी : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा वाढदिवस वैभववाडी उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने येथील  ग्रामीण रुग्णालयात  फळे वाटप करण्यात आले. 

श्री.नाईक यांचा आज वाढदिवस आहे. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा आलेला हा वाढदिवस कार्यकर्त्यांनी जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वैभववाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, उपाध्यक्ष अनंत पवार, शहराध्यक्ष अक्षय पंडित, कुंभवडे उपसरपंच विनोद कदम, डॉ.विवेक साकळकर, अमित पांचाळ, अमोल आमकार, महेंद्र तांबे आदी उपस्थित होते.