
दोडामार्ग : भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय व साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे फळ वाटप व बेडशीट वाटप करुन वाढदिवस सामाजिक बांधिलकी ठेवत साधेपणाने साजरा करण्यात आला.
विशाल परब यांचा वाढदिवस बुधवारी दोडामार्ग तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल येथे फळ वाटप व बेडशीट वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यकारिणी चिटणीस सुधिर दळवी, रमेश दळवी, शहर अध्यक्ष राजेश फुलारी, चिटणीस भैय्या पांगम, डॉ. नित्यानंद मसुरकर, रामदास रेडकर, तुषार गवस, मनाली सावंत, निलेश वरवटकर, आनंद नाईक, सुरज बनतोडे, जगदिश पाटील, प्रियांका देसाई, विवेक सुतार, दिपिका मयेकर, शिरिष नाईक, सूर्यकांत धरणे, अजय दळवी, संजय देसाई, कृष्णा गवस, सदानंद धरणे, पांडूरंग धरणे, सुरेश धरणे, शरद गवस,आनंद नाईक, विश्वनाथ घाडी, श्याम घाडी, राजाराम डिंगणेकर, महेश लोंढे, विनोद बिर्जे, महेश गवस, प्रकाश देसाई, मोहन देसाई, प्रमोद दळवी आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय, साटेली - भेडशी प्राथमिक रुग्णालय, तळकट व मोरगाव प्राथमिक रुग्णालय येथे फळ वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.