
सावंतवाडी : राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज सावंतवाडी प्रशालेत राजर्षी शाहू महाराज जयंती व स्व. नाम. भाईसाहेब सावंत पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेतील गरजू व होतकरू अशा २८ विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
यापैकी काही गणवेश शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ. सुखदा म्हापणकर , सेवानिवृत्त शिक्षिका सौ. सुनिता पोरोब आणि माजी विद्यार्थी विठ्ठल बाळकृष्ण नाईक यांनी पुरस्कृत केले होते. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी सहाय्यक शिक्षक श्री. कशेळीकर व स्व. नाम.भाईसाहेब सावंत यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी श्रीम. देसाई यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे विद्यमान सचिव आणि माजी मुख्याध्यापक व्ही. बी.नाईक, प्रशालेच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक श्री. पाटील आदी उपस्थित होते. तसेच यांच्यासमवेत गणवेश दाते सेवानिवृत्त शिक्षिका सुखदा म्हापणकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. प्रतिमापूजन करून या सर्व मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.