राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मोफत वृक्ष रोपांचं वाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: June 13, 2025 20:50 PM
views 154  views

सावंतवाडी : राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सावंतवाडीत मनसेतर्फे एक हजार मोफत वृक्ष  रोपांचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती शहर अध्यक्ष ॲड. राजू कासकर यांनी दिली. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने उद्या सकाळी सावंतवाडी येथील नगरपालिकेजवळ मोफत एक हजार झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात येणार असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शहर अध्यक्ष ॲड राजू कासकर यांनी केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर, उप जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान तालुक्यात उद्या अन्य ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिली आहे.