
वैभववाडी : कोकण रेल्वे वाहतूक बंद असल्याने वैभववाडी रेल्वे स्थानकात थांबलेल्या मंगलोर एक्स्प्रेसमधील प्रवाशांना रोटरी क्लब ऑफ वैभववाडीकडून मोफत अल्पोपहार पुरविण्यात आला. ही गाडी रविवारी मध्यरात्री १वाजल्यापासून या स्थानकात उभी आहे.
दिवाणखवटी येथे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.तर काही गाड्या ठिकठिकाणी रेल्वे स्थानकावर उभ्या करून ठेवल्या आहेत. रविवारी मध्यरात्री मुंबईच्या दिशेने जाणारी मेंगलोर मध्यरात्री १वाजल्यापासून वैभववाडी स्थानकात उभी आहे. या रेल्वे प्रवाशांना आज सकाळी अल्पोपहाराची सोय रोटरी क्लबने केली.
गाडीतील सुमारे एक हजार प्रवाशांना बिस्कीट पुडा पाणी बॉटल यांच मोफत वाटप करण्यात आले.यावळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, रोटरीचे चार्टर्ड प्रेसिडेंट संतोष टक्के माजी प्रेसिडेंट संजय रावराणे, मंगेश कदम, मुकुंद रावराणे, मंगेश कदम, प्रशांत कुलये, संदीप मोरे, शैलेंद्र भोवड, श्रीशांत रावराणे, मंथन टक्के, मनोज सावंत, मोहिनी मोरे, स्नेहल खांबल, गंगाधर केळकर आदी रोटरियन उपस्थित होते. प्रवासी व स्टेशनमास्टर यांनी रोटरीचे आभार मानले.