समीर नलावडेंच्या माध्यमातून मोफत कमळ वाटप..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 18, 2023 13:07 PM
views 149  views

कणकवली : कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कणकवली पटवर्धन चौकात आज सोमवारी मोफत कमळ फुल वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. कणकवलीत पटवर्धन चौकासह शहरातील माजी नगरसेवकांमार्फत प्रभागांमध्ये देखील कमळ फुलाचे वाटप करण्यात आले. पक्षाचे चिन्ह यानिमित्ताने घराघरात पोहचावे व गणेशोत्सव कालावधीमध्ये नागरिकांना मोफत कमळ उपलब्ध व्हावे या उद्देशून नगराध्यक्ष यांनी मोफत कमळ फुलाचे वाटप केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासोबत जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, माजी नगरसेवक संजय कामतेकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक बंडू गांगण, किशोर राणे, अभय राणे, निखिल आचरेकर, समीर प्रभूगावकर, महेश सावंत, सुभाष मालडकर, सचिन पाटील, राजा पाटकर, नऊ झेमने, जावेद शेख आदी उपस्थित होते.