एस एस पी एम लाईफटाईम हॉस्पिटल येथे पोटाच्या कर्करोगावर दुर्बिणीद्वारे मोफत शस्त्रक्रिया.

Edited by: beuro
Published on: May 16, 2023 17:28 PM
views 144  views

एस एस पी एम लाईफटाईम हॉस्पिटल येथे पोटाच्या कर्करोगावर दुर्बिणीद्वारे मोफत शस्त्रक्रिया. 

सोमवार दिनांक १५ मे  रोजी  शिरवंडे तालुका मालवण येथील चिंतामण पांडुरंग गावकर यांची पोटाच्या कर्करोगावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया अगदी यश्यस्वीरित्या पार पडली. ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली असून गरीब सिंधुदुर्गवासियांचे आता एस एस पी एम लाईफटाईम हॉस्पिटलमधील कॅन्सर सेंटर येथे अगदी मोफत उपचार केले जात आहेत. 

चिंतामण पांडुरंग गावकर यांनी मुंबईत बऱ्याच ठिकाणी या कर्करोगाच्या उपचारासाठी विचारणा केली. मात्र उपचाराच्या खर्चाची रक्कम पाहता हा उपचार करावा की नाही या विचारात कुटुंबीय होते. एस एस पी एम लाईफटाईम हॉस्पिटल मधील कँसर सेंटरची माहिती त्यांना समजली यानुसार चिंतामण पांडुरंग गावकर यांच्या कुटुंबीयांनी त्यांना या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले . येथील डॉ. अनुप ताम्हणकर (कर्करोग तज्ञ), डॉ. शैलेंद्र शिरवडकर (भूलतज्ञ), देवेंद्र घाडीगावकर (ओ. टी. टेक्निशियन), कविता ओरोसकर, कविता वाटेगावकर, नितीन कसालकर, समीक्षा सावंत, नमिता सावंत, ज्योती तारापूर (नर्सिंग स्टाफ), रोहन हरमळकर(वॉर्डबॉय), सुदेशना गावकर (वॉर्डआया) या संपूर्ण टीमने चिंतामण गावकर यांच्यावर पोटाच्या कर्करोगाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया अगदी यशस्वी पार पाडली. यशस्वी शस्त्रक्रिया आणि एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी एकही रुपया खर्च न आल्यामुळे गावकर कुटुंबीय अगदी भारावून गेले.