
मालवण : जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल-ताशा पथक वर्धापन दिनानिमित्त सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, स्वराज्य संघटना, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर, सिंधुदुर्ग व पडवे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर ८ मार्चला सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित केले आहे.
शिबिराचे उद्घाटन सकाळी नऊ वा. मालवण तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस अधिकारी प्रतिज्ञा खोत यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरात हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी, कर्करोग तपासणी, प्रसुतीशास्त्र, स्त्रीरोग तपासणी, नेत्र तपासणी, अस्थिरोग तपासणी, नेफ्रोलॉजी तपासणी, दंतरोग चिकित्सा होणार आहे. आजार डिटेक्ट झाल्यास शस्त्रक्रिया मोफत केली जाईल. हे शिबीर लहान मुले, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांसाठी खुले आहे. माहितीसाठी शिल्पा खोत ९४२२५८४६४१, अश्विनी आचरेकर, दीक्षा लुडबे, निकिता तोडणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.