नाणोसमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

Edited by: विनायक गांवस
Published on: August 06, 2025 16:51 PM
views 69  views

सावंतवाडी : नाणोस ग्रामपंचायत आणि आदिशक्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाणोस गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. विक्रम म्हस्के, सरपंच अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत अधिकारी  मुकुंद परब, आदीशक्ती समिती अध्यक्षा मयुरी कांबळी, ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर, रसिका जोशी, आरोग्य सहाय्यक उमाजी राणे, समुदाय आरोग्य अधिकारी सिद्धि शेट्ये, आरोग्य सेविका ज्योत्स्ना नवार, आरोग्य सेवक श्री प्रशांत सावंत, सिमाली गवाणकर, नम्रता नाणोसकर, नयन कांबळी, रतिष्मा शेट्ये, बबन नाणोसकर, वासुदेव जोशी, सौ राधाबाई शेट्ये आदी महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.