
कणकवली : शिवजयंतीचे औचित्य साधून युवासेना कलमठ विभागाच्या वतीने कलमठ बाजारपेठ येथे मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे यामध्ये महिलांसाठी थायरॉईड टेस्ट केली जाणार आहे. तसेच Hba1c, हिमोग्लोबिन तपासणी CBC, कॅन्सर रोगाची तपासणीकॅल्शियम तपासणी आदी तपासण्या मोफत केली जाणार आहे. व 18 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर होणार आहे. तरी या मोफत आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा व इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदानही करावं असे आवाहन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.