
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संचलित व सुंदरवाडी ग्रुप सावंतवाडी (माजी विद्यार्थी एस पी के) ने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू तरुण तरुणींसाठी आगामी काळात होणाऱ्या आर्मी अग्निवीर , पोलिस, पीएसआय, एसटीआय, एएसओ, वनरक्षक, आदी भरतींच्या पार्श्वभूमीवर दिनांक १९, २०, २१ एप्रिल २०२५ असे तीन दिवस सकाळी ७.३० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत पोलिस परेड मैदान, सावंतवाडी येथे मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व भरती मधून ३०००० पेक्षा जास्त जागा अपेक्षित असल्याने जिल्ह्यातील १२ वी पास, पदवीधर होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक श्री.दयानंद गवस व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. "आता पुढे काय..?" असा प्रश्न उपस्थित होत असणाऱ्या जिल्ह्यातील १२ वी व पदवीधर विद्यार्थ्यांना करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या शिबिरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक श्री.दयानंद गवस हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत.
गेली चार वर्षे पोलिस करिअर अकॅडमीच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक युवतींना ते पोलिस भरती करिता मार्गदर्शन करीत असून सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलात अल्पावधीतच चार युवतींची निवड झाली आहे हे नक्कीच अभिनंदनीय..! त्यामुळे १००% भरतीची हमी देणारी व अल्पावधीतच सर्वाधिक निकाल देणारी संस्था म्हणून पोलिस करिअर अकॅडमी ओळखली जाते. या शिबिरामध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी नाव नोंदणीसाठी सतीश कविटकर ९४२३३०४४३३ व अक्षय मोर्ये ८२६५०६२६२८ यांच्याशी संपर्क साधावा.