
कुडाळ : विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २८ जानेवारीला सकाळी १० ते सायंकाळी ४ या कालावधीत कुडाळ येथील कार्यालयात कुडाळ पोस्ट ऑफीस समोर, माधवबागच्या शेजारी आयोजित करण्यात आले आहे. यात मोतीबिंदू तपासणी व निदान, डोळ्यांच्या पडद्याची तपासणी, डोळ्यांचा कोरडेपणा, काचबिंदू निदान व तपासणी, चष्म्याचा अचूक नंबर, दृष्टीक्षमता व नजर या तपासण्या केल्या जातील.
ज्यांना मधुमेह आहे, सतत मोबाईल व कॉम्प्युटर हाताळणाऱ्या, वय वर्षे ४० असणारे, तिरळे डोळे असलेली मुले, धुरकट व अंधुक दिसत असल्यास, मोतीबिंदूची शंका असणारे अशा व्यक्तींसाठी नेत्र तपासणी आवश्यक समजली जाते. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर खास ऑफर देण्यात आली आहे. यात ६ हजार रुपयांची विना टाका शस्त्रक्रिया ३ हजार ९९९ रुपयात तर ११ हजार रुपयाची फेको शस्त्रक्रिया ७ हजार ९९९ रुपयात उपलब्ध केली जाणार आहे. तसेच १५ हजार ते १ लाख पर्यंतच्या लेन्सवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी ९८५०८४९३१५ / ८४०८८०३५३६ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.