
वैभववाडी : उबाठा युवासेनेच्यावतीने दि १६ डिसेंबर २०२३रोजी सकाळी ९ते दुपारी २ या वेळेत वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत मोती बिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या शिबिराला शिवसेना जिल्हाप्रमुख- संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्या सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे. तसेच नागरिकांनी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन युवा सेनेचे जिल्हाचिटणीस स्वप्निल धुरी यांनी केलं आहे.