बिटकॉइनमध्ये गुंतवणूकीचा मोह पडला भारी !

43 हजारांची फसवणूक
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 15, 2023 14:47 PM
views 546  views

सिंधुदुर्ग : बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी टेलिग्रामवर लिंक पाठवून त्या लिंक वरून दोन वेगवेगळ्या व्हाट्सअप वरून पैसे गुंतवण्यास सांगून सुमारे 43 हजारांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना कुडाळ तालुक्यातील अणाव येथे घडली आहे. ही घटना 1 ते 2 नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. याबाबतची तक्रार केतन वैभव अनावकर यांनी सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

चांगले रिटर्न्स मिळवून देऊ असे सांगत अनाव येथील केतन वैभव आणावकर यांना एक नोव्हेंबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत टेलिग्रामच्या माध्यमातून तसेच व्हाट्सअप च्या माध्यमातून बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करा असे सांगत तब्बल सुमारे 43 हजारांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली. याबाबत संबंधित तक्रारदार वैभव अनावकर यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. याबाबत सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात रीतसर अज्ञात व्यक्ती विरोधात भादवी कलम 420, आयटी ऍक्ट नुसार 66 सी , 66 डी, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबतचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करत आहेत.