
मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांच्या प्रयत्नाने मंडणगड तालुक्यातील चार शाळांचे संगणीकीकरणाचे काम नुकतेच पुर्ण झाले आहे. तालुक्यातील देव्हारे, आंबडवे, म्हाप्रळ उर्दू हायस्कुल, नँशनल हायस्कुल लाटवण या शाळांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. त्यामुळे या शाळांची संगणक नसल्याने होणारी मोठी गैरसोय दूर झाली आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांना जगातील माहीतीचा स्त्रोत या उपक्रमामुळे खुला झाला आहे. पार्टीने या पुढाकार घेत हाती घेतलेले काम काम पुर्ण केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
मंडणगड तालुक्यातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी तसेच ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मुळ प्रवाहात आणण्यासाठी खासदार सुनिल तटकरे नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्या प्रयत्नामुळे ग्रामिण भागातील शाळा इंटरनेटचे माध्यमातून जगाशी जोडल्या जाणार असल्याचे व जगाचे ज्ञान येथील विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकदाम यांनी या निमीत्ताने सांगीतले आहे व तालुकावासीयांचेवतीने खासदार सुनील तटकरे व महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मंत्री आदीती तटकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत. कोलाड सुतारवाडी येथे नुकत्याच झालेल्या संगणक वाटप कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे, संबंधीत शाळांचे प्रतिनिधी यांच्यासह तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांच्यासह प्रकाश शिगवण, सतिष दिवेकर, भाई मालगुंणकर मिलींद धोतरे आदी मान्यवर उपस्थित होते.